मंगल कार्यालयात काेविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:21+5:302021-04-23T04:39:21+5:30
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरराेज रुग्ण दाखल हाेत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्र.१ ...

मंगल कार्यालयात काेविड सेंटर सुरू करा
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरराेज रुग्ण दाखल हाेत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्र.१ व २ हे काेराेनातील वाॅर्ड फुल्ल झाले आहेत. अनेक रुग्णांना बेड मिळत नसून त्यांची गैरसाेय हाेत आहे. काेराेनाबाधितांवर याेग्य व परिपूर्ण औषधाेपचार हाेण्यासाठी खासदार, आमदारांच्या स्थानिक निधीतून गडचिराेली शहरातील मंगल कार्यालयात काेविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे यांनी शासनाकडे केली आहे.
काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णांना वेळेवर औषधाेपचार मिळत नाही. खाली झाेपून रुग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. अशा स्थितीमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी काेविड केअर सेंटर उभारण्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून आर्थिक सहकार्य करावे. काेविड केअर सेंटरसाठी सध्या रिकामे असलेल्या मंगल कार्यालयाचा वापर हाेऊ शकताे, असे चवळे यांनी म्हटले आहे.