गडचिरोली-औरंगाबाद बस सुरू करा
By Admin | Updated: May 10, 2017 01:28 IST2017-05-10T01:28:02+5:302017-05-10T01:28:02+5:30
गडचिरोली आगारात सकाळी ७.१५ वाजता सुटणारी गडचिरोली-औरंगाबाद ही बस अचानक बंद करण्यात आली.

गडचिरोली-औरंगाबाद बस सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली आगारात सकाळी ७.१५ वाजता सुटणारी गडचिरोली-औरंगाबाद ही बस अचानक बंद करण्यात आली. सदर बस पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गडचिरोली-औरंगाबाद ही बस गडचिरोली-चंद्रपूर-यवतमाळ-वाशिम-कारंजा-मेहकर-सिंदखेडराजा- जालना मार्गे औरंगाबादला जात होती. वाशिम, कारंजा, मेहकर या भागातील अनेक कर्मचाऱ्यांची गडचिरोली येथे नोकरी आहे. प्रशासकीय कामानिमित्त तसेच देवदर्शन, सहलीसाठीही नागरिक शिर्डी, पुणे येथे जात होते. त्यांच्यासाठी सदर बस अत्यंत सोयीची होती. रात्री उशीरापर्यंत सदर बस गडचिरोली येथे पोहोचत होती. ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रा. शेषराव येलेकर यांनी केली आहे.