कोरची तालुक्यात बसफेऱ्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:47 IST2017-04-02T01:47:43+5:302017-04-02T01:47:43+5:30
तालुक्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष घालून बसफेऱ्या

कोरची तालुक्यात बसफेऱ्या सुरू करा
तहसीलदारांना निवेदन : सेवा बंद असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची अडचण
कोरची : तालुक्यात दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष घालून बसफेऱ्या सुरू करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला निर्देश द्यावेत, अशी मागणी तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरची हा गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला तालुका आहे. या तालुक्याच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. त्यामुळे आंतरराज्यीय बसफेऱ्या सुरू होणे आवश्यक आहे. गडचिरोली ते कोरची व राजनांदगाव ही नवीन बसफेरी सुरू करावी, त्याचबरोबर गडचिरोली-कोरची-गोंदिया ही बसफेरी जुनीच आहे. मात्र गडचिरोली आगाराने अचानक सदर फेरी बंद केली. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गडचिरोली-कोरची-बोटेकसा-बेतकाठी-बोरी-कोटगूल- गडचिरोली-कोरची-कोटरा-कोकोडी, कोचीनारा-कोरची-दवंडी-बेलगाव ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर कोरची नगर पंचायतीचे नगरसेवक तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष श्यामलाल मडावी, उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, जि.प. सदस्य अनिल केरामी, नगरसेवक मेघश्याम जमकातन, नगरसेविका हर्षलता भैसारे, बिहिटेकला ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदिश कपूरडेहरिया,, बेतकाठीचे उपसरपंच हकीमुद्दीन शेख, सदरूद्दिन भामानी, माजी जि.प. सदस्य प्रमिला काटेंगे, कोरची पंचायत समितीचे माजी उपसभापती हेमलता शेंडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल अंबादे, धनराज मडावी, विठ्ठल शेंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)