शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धानावर तत्काळ फवारणी करा

By admin | Updated: October 19, 2016 02:31 IST

धान पिकावर तुडतुडा, करपा रोगाबरोबरच बेरड (सुरळीतील अळी) रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे.

गडचिरोली : धान पिकावर तुडतुडा, करपा रोगाबरोबरच बेरड (सुरळीतील अळी) रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. धान पिकावर प्रामुख्याने धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी, बेरड, तुडतुडे या किडींचा तर करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कोरची, गडचिरोली तालुक्याचे सर्वेक्षण केले असता, या धान पिकावर तुडतुडा या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कीड व रोगाच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे, डॉ. सुधीर बोरकर, विषय विशेषतज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे. उशिरा येणाऱ्या धानाच्या बेरडचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी मॅलॉथिआॅन ५० टक्के प्रवाही (३०) मिली किंवा कार्बारील (पा. मि. भुकटी) २० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तपकिरी तुडतुडी आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडीची संख्या १० ते १५ प्रति चुड दिसून आली आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी फ्रिप्रोनिल ५ एस. सी. (२० मि.ली) किंवा थॉयोमेथाक्झाम २५ डब्ल्यूजी (२ गॅ्रम) किंवा फेन्योएट ५० टक्के प्रवाही (१० मि. ली) किंवा ट्रयझोफॉस ४० ई. सी. (२० मि. ली.) यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अथवा मेटाराझीयम अ‍ॅनीसोपली या जैविक बुरशीनाशकाची २.५० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे वापर करावा. सोबतच पेरावरील करपा, मानेवरील करपा आणि कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव असल्याचा आढळल्यास कार्बन्डाझीम १० ग्रॅम किंवा आॅपर आॅक्झीक्लोराईड २५ ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम या बुरशी व जीवाणूनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवाणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)