शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी गडचिराेलीवरून विशेष बसगाड्यांची हाेणार साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

पूर्व विदर्भात अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे एकाचवेळी व एकाच दिवशी पाहणे शक्य हाेत नाही. परिणामी नागरिक या स्थळांना भेटी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळचे ठिकाणी असूनही ही स्थळे अनेकांनी बघितली नाहीत. एस.टी.ने आता या स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवारी व रविवारी कर्मचारी व इतर वर्गाला सुटी असल्याने या दाेन दिवशी तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र बसेस साेडण्याचे नियाेजन एस.टी.ने केले आहे.

ठळक मुद्देशनिवारी व रविवारी स्वतंत्र बस; गाेसेखुर्द, इटियाडाेह, मेडीगड्डाचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा व गाेंदिया जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळे व तीर्थस्थळांसाठी गडचिराेली येथून दर शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी स्वतंत्र बसेस साेडल्या जाणार आहेत. कमी खर्चात एकाच दिवशी अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी जिल्हावासीयांना उपलब्ध हाेणार आहे. पूर्व विदर्भात अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे एकाचवेळी व एकाच दिवशी पाहणे शक्य हाेत नाही. परिणामी नागरिक या स्थळांना भेटी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळचे ठिकाणी असूनही ही स्थळे अनेकांनी बघितली नाहीत. एस.टी.ने आता या स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवारी व रविवारी कर्मचारी व इतर वर्गाला सुटी असल्याने या दाेन दिवशी तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र बसेस साेडण्याचे नियाेजन एस.टी.ने केले आहे. एकाच मार्गावर असलेल्या विविध स्थळांना भेटी देता येईल, या उद्देशाने मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी गडचिराेली आगारातून बस निघेल व सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत बस आगारात पाेहाेचेल. अंतरानुसार तिकीट ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात चार मार्ग निवडण्यात आले आहेत. या मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बसेसची संख्या वाढविली जाणार आहे. 

पर्यटक व भाविकांच्या साेयीसाठी स्वतंत्र बसेस सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन नाेंदणी करता येणार आहे. तसेच अधिकची माहिती बसस्थानकावर उपलब्ध हाेईल. पुरेसे प्रवासी मिळाल्यानंतर बस साेडली जाणार आहे. कमी खर्चात अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी या बसमुळे उपलब्ध हाेणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.- अशाेक वाडीभस्मे, विभाग नियंत्रक गडचिराेली

या ठिकाणांना भेट देण्याची संधीगाेसेखुर्द-घाेडाझरी-गायमुख-अड्याळटेकडीसाठी सकाळी ८ वाजता गडचिराेली येथून बस निघेल. ही बस त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता गडचिराेलीत परत येईल. यासाठी २१५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. ब्रह्मपुरी-चपराळ-नवेगाव बांध-इटियाडाेह या स्थळांसाठी सकाळी ८ वाजता बस निघेल. त्यासाठी २१५ रुपये तिकीट आकारली जाईल.अहेरी-कमलापूर (हत्तीकॅम्प)- वडधम- मेडीगड्डा-साेमनूर (त्रिवेणी संगम) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस गडचिराेलीला परत येईल. यासाठी ४१० रुपये तिकीट आकारले जाईल. सेमाना-मार्कंडादेव-चिचपल्ली (हनुमान मंदिर)-अजयपूर (झाेपला माराेती) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस परत येईल. यासाठी २६० रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनstate transportएसटी