शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा तिढा कायम

By admin | Updated: October 11, 2015 02:28 IST

रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे.

वडसा एमआयडीसी : पशुसंवर्धन विभागाला द्यावे लागणार २१.२४ कोटी रूपयेगडचिरोली : रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे. सदर जागा मिळविण्यासाठी शासनाला एनपीव्हीपोटी पशुसंवर्धन विभागाला २१.५४ कोटी रूपये अदा करावी लागणार आहे. तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला आहे. मोठी बाजारपेठ व रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या देसाईगंज येथे औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहे. याकरिता महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विसोरा भागात जाऊन जागेचा शोध घेतला. देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे ४५९.०६ हेक्टर आर. संरक्षित वनजमिनीपैकी २०० हेक्टर आर जमीन विनावापर असल्याचे दिसून आले. सद्य:स्थितीत विसोरातील बदक पैदास केंद्रालगत असलेली ही जागा पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याच परिसरातील २८ हेक्टर क्षेत्र जमीन एसआरपीएफला हस्तांतरीत केली आहे. प्रादेशिक अधिकारी नागपूर यांनी १० जुलै २०१५ रोजी उपवनसंरक्षक वडसा यांचेसोबत विनावापर असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या २०० हेक्टर जागेची पाहणी करून निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सभा घेण्यात आली. या सभेत सदर जागा हस्तांतरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. निर्वणीकर प्रस्ताव सादर करून वन जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी वनिकरणाकरिता १०.७७ लक्ष प्रती हेक्टर दराने २०० हेक्टर जमिनीकरिता २१.२४ कोटी रूपये एनपीव्ही भरावा लागेल, असे उपवनसंरक्षक वडसा यांनी औद्योगिक विकास महामंडळास कळविले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्वणीकरण प्रस्ताव सादर करून शासनाने याकरिता एनपीव्हीचा निधी उपलब्ध करून मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्य शासन यावर काय निर्णय घेते याकडे देसाईगंजसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)