वरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी
By Admin | Updated: July 21, 2014 23:52 IST2014-07-21T23:52:06+5:302014-07-21T23:52:06+5:30
चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथे यांत्रिक पद्धतीने खत व बी पेरणी बीबीएफ प्लन्टर किंवा रूंद सरी वरंबा खत व बी पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच कृषी विज्ञान केंद्र

वरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथे यांत्रिक पद्धतीने खत व बी पेरणी बीबीएफ प्लन्टर किंवा रूंद सरी वरंबा खत व बी पेरणी यंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोलीच्यावतीने करून दाखविण्यात आली. सदर प्रात्यक्षिक शेतकरी रवी चुनारकर यांच्या शेतावर यांत्रिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करून दाखविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून विषय विशेष तज्ज्ञ प्रा. संदीप कऱ्हाळे उपस्थित होते. बीबीएफ प्लन्टर हा खत व बी पेरणी एकाच वेळीस शिफारशीत केलेल्या बियाणांच्या प्रमाणामध्ये मिश्रीत केल्या जातो. त्यामुळे खत व बी पेरणी करण्याकरिता मजुरांची गरज भासत नाही. परिणामी मजुरांचे श्रम बचत होते. सदर यंत्र ट्रॅक्टरचलीत आहे. त्यामुळे काम होण्यास गती प्राप्त होते. खत व बी भरण्याकरिता मजुरांची गरज भासत नाही. केवळ एकाच व्यक्तीची गरज असते. खत आणि बी पेरणीसह या यंत्राद्वारे रूंद सऱ्यासुद्धा पाडल्या जातात. त्यामुळे अतिपावसामध्ये अधिकचे पाणी सऱ्यांच्या माध्यमातून शेताबाहेर जाते. कमी पावसामध्ये उताराला आडवी पेरणी केल्यास जलसंधारण होते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन १० ते २० टक्के उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन प्रा. संदीप कऱ्हाळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)