संविधानामुळे सार्वभौमत्व प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:52 IST2017-11-26T00:52:34+5:302017-11-26T00:52:59+5:30

भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे.

Sovereignty provided due to constitution | संविधानामुळे सार्वभौमत्व प्रदान

संविधानामुळे सार्वभौमत्व प्रदान

ठळक मुद्देभुपेंद्र रायपुरे यांचे प्रतिपादन : तळोधी येथे कार्यक्रम

ऑनलाईन लोकमत 
तळोधी मो. : भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता कायद्याचे पालन करण्याची कसब नमूद आहे. जगात सार्वभौमत्व प्रदान करणारा एकमेव संविधान असल्याचे प्रतिपादन प्रमुख अधिवक्ता अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे यांनी केले.
तळोधी केंद्रांतर्गत ग्रामपंचायत आवारातील सभागृहात संविधान दिन समारोहाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रमेश बारसागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाम रामटेके, गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे, धर्मानंद मेश्राम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी सुरजागडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख गौतम मेश्राम, ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले, पर्यवेक्षिका वाळके, मुख्याध्यापक बोमनवार, मारोती दुधबावरे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक रमेश बारसागडे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना केलेल्या चिंतनावर भर टाकला. शाम रामटेके यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. धर्मानंद मेश्राम यांनी संविधान संहितेच्या वापराबाबतची माहिती दिली. दीपक देवतळे यांनी संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मारोती दुधबावरे, संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार मुख्याध्यापक बोमनवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेच्या कर्मचाºयांनी, शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Sovereignty provided due to constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.