हातोड्याचे घाव घालून मुलाकडून वडिलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 10:36 IST2022-02-04T10:30:49+5:302022-02-04T10:36:49+5:30

गुरुवारी सकाळी वडील दामाेदर व मुलगा तेजस यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान या भांडणादरम्यान तेजसने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घातले. 

son killed his father with hammer in gadchiroli | हातोड्याचे घाव घालून मुलाकडून वडिलाची हत्या

हातोड्याचे घाव घालून मुलाकडून वडिलाची हत्या

ठळक मुद्देगडचिरोलीनजीक विसापूर येथील घटना

गडचिराेली : सतत त्रास देत असलेल्या वडिलांवर हातोड्याचे घाव घालून मुलाने त्यांची हत्या केली. ही थरारक घटना ३ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजताच्या सुमारास गडचिराेलीनजीकच्या विसापूर येथे घडली. दामाेदर तांगडे (५३ वर्ष) असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा तेजस तांगडे (२० वर्ष) याला अटक केली.

नळ फिटिंगची कामे करणारा मृत दामाेधर हा अतिशय तापट स्वभावाचा हाेता. त्यामुळे त्याचे कुटुंबातील इतर सदस्यांसाेबत अजिबात पटत नव्हते. यापूर्वी दामाेदरने तीन वेळा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हाेता, मात्र त्याला पाेहता येत असल्याने ताे विहिरीतून बाहेर निघत हाेता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पैशांवरून उद्भवलेल्या वादाचे खुनात पर्यवसान

गुरुवारी सकाळी वडील दामाेदर व मुलगा तेजस यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान या भांडणादरम्यान तेजसने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घातले. यामुळे रक्तबंबाळ होऊन दामाेदर जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दामोदर यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मोठा मुलगा पोलीस खात्यात आहे. ज्याच्या हातून हत्या झाली तो लहान असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तेजस तांगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला दोन तासात अटक केली.

Web Title: son killed his father with hammer in gadchiroli