भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST2020-07-28T05:00:00+5:302020-07-28T05:00:30+5:30

भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे.

Solar light in Bhatia | भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

ठळक मुद्देअतिदुर्गम गाव : सीआरपीएफ व पोलिसांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील बहुतांश गावे पक्के रस्ते, वीज व अन्य मूलभूत सोयींच्या प्रतीक्षेत आहेत. सायंकाळनंतर अनेक गावांमध्ये अंधार पसरतो. या गावातील नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. २५ वर्षांपूर्वी वसलेल्या भाटियाटोला (नारगुंडा टोला) येथे वीज पोहोचली नाही. नागरिक उजेडाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा सीआरपीएफ व पोलिसांनी गावात सौरदिवे लाऊन पूर्णत्त्वास आणली.
भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे. मात्र आजही गावात जाण्यासाठी रस्ता, पाण्याची व विजेची सोय नाही. ही बाब सुरक्षा दलाच्या निदर्शनास आली. तेव्हा सीआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांच्या सुचनेनुसार नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत सीआरपीएफ ३७ बटलियनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय तुकाराम खडके व पोलीस कर्मचारी गावात जाण्याचे ठरविले. सीआरपीएफच्या सिविक एक्शन कार्यक्रम अंतर्गत गावात सौर ऊर्जेवरील दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सौरदिवे लावले.
गावात सौर ऊर्जेवरील दिवे लागल्याने प्रकाश पोहोचला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किमान सौरदिव्यांचा तरी प्रकाश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदून द्यावे, अशी मागणी याप्रसंगी नागरिकांनी केली.

खांद्यावरून साहित्याची केली वाहतूक
भाटियाटोला गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने सौरदिव्याचे साहित्य पोहोचविण्याचे मोठे आव्हान सीआरपीएफ व पोलीस जवानांसमोर होते. तेव्हा जवानांनी खांद्यावर लोखंडी खांब, सिमेंट, गिट्टी व इतर साहित्य घेऊन पायवाटेने नाला पार करीत थेट गाव गाठले. त्यानंतर गावात सौरदिवे उभे करून नागरिकांना दिलासा दिला.

Web Title: Solar light in Bhatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.