धान्य व तेलाच्या भावात प्रचंड घसरण
By Admin | Updated: June 6, 2014 00:01 IST2014-06-06T00:01:15+5:302014-06-06T00:01:15+5:30
२६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या

धान्य व तेलाच्या भावात प्रचंड घसरण
गडचिरोली : २६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या किंमतीत मोठी घसरण बाजारात झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ‘अच्छे दिन आए है’ ची चाहूल लागली आहे. या मालाची साठवणूक करून ठेवणार्या व्यापार्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी सरकारपुढे या दृष्टीकोनातून काम करेल या भीतीनेच बाजारात ही भावाबाबतची घसरण झाली, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीन तेलाचे भाव ८८ रूपये होते. ते आता ८२ रूपये किलोवर आले आहेत. शेंगदाना तेल ११0 रूपये किलो होते. ते ९५ रूपयावर आले आहे. तुरीची डाळ ७२ रूपये किलो होती. ती ६८ रूपयावर आली आहे. हरभरा डाळ ४0 रूपये किलो होती. ती ३४ रूपये किलोवर आली आहे. लाल मिरची ६0 रूपये किलो होती. ती ५0 रूपयांवर आली आहे. साखर ३५ रूपये किलो होती. ती ३२ रूपये किलोवर आली आहे. गहू ३0 रूपये किलो होते. ते २५ रूपये किलोवर आले आहे. तर तांदूळ ३0 रूपये किलो होते. ते २८ रूपयांवर आले आहे.
व्यापार्यांकडून दराचीही घसरण होण्यात सरकारचा कोणताही निर्णय कारणीभूत नाही. मात्र भाव घसरलेले आहेत. साखरेच्या किंमती किलो मागे ३ रूपयाने कमी झाले आहे. तर तेलाच्याही किंमती १0 ते १५ रूपयांनी कमी झाले आहे. मोठय़ा शहरांमध्ये या मालाची साठवणूक करून ठेवणार्या व्यापार्यांना भावात घसरण झाल्यामुळे लाखो रूपयाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे हित लक्षात घेऊन साखरेचे भाव यापूर्वी कमी होऊ दिल्या जात नव्हते. परंतु मोदी सरकार येताच साखरेचेही भाव घसरले आहे. त्यामुळे कारखानदारांनाही मोठा फटका यामुळे बसला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र भावात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)