सेल्फी काढणे दोन तरुणांच्या बेतले जिवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 19:16 IST2018-01-26T19:16:08+5:302018-01-26T19:16:17+5:30

सुटीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयावर फिरायला गेेल्यानंतर काठावरुन सेल्फी काढणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. सेल्फी काढताना एक तरुण पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात बुडाला

Sleefe to get rid of two young people | सेल्फी काढणे दोन तरुणांच्या बेतले जिवावर

सेल्फी काढणे दोन तरुणांच्या बेतले जिवावर

कूरखेडा (गडचिरोली)- सुटीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयावर फिरायला गेेल्यानंतर काठावरुन सेल्फी काढणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. सेल्फी काढताना एक तरुण पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात बुडाला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी 2 वाजेचा सुमारास घडली. मृतकांमध्ये एजाज़ नईम शेख (25) व परवेज गोटेफोडे (24) यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित सुटी व बाजारपेठ बंद असल्याने हे दोघे काही मित्रांसोबत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह जलाशयावर  गेले होते. तेथे सेल्फी काढण्याचा नादात एकाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा प्रयत्नात दूसराही युवक खोल पाण्यात बुडाला. दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणीकरीता केशोरी रूग्नालयात आणण्यात आले आहेत.

 गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील हे सर्वात मोठे जलाशय आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण निसर्गरम्य परिसरात असल्याने सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी असते. पण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेतली जात नाही.

Web Title: Sleefe to get rid of two young people