शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागेपल्ली व कढोलीतील अपघातात सहा जण जखमी

By admin | Updated: January 29, 2016 04:31 IST

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ट्रॅक व मिनी ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन तीन जण या अपघातात गंभीर

अहेरी/वैरागड : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ट्रॅक व मिनी ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन तीन जण या अपघातात गंभीर तर कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वळणावर ट्रॅक्टर उलटल्याने तीन जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली. अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर गुरूवारी सकाळी ११ वाजता ट्रक व मिनी ट्रकची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. मिनी ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ०९८० चंद्रपूरवरून आलापल्लीकडे ब्रेड व केक घेऊन येत होता. त्याचवेळी विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी १८६५ ने ट्रकने मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. यात मिनी ट्रकचा पुढील भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. या अपघातात यातील छोटू मंडल (३५), प्रशांत पाल (३०), देवा रॉय (२५) रा. सर्व चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले. तत्काळ १०८ रूग्णवाहिकेला बोलावून जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १०८ चे वैद्यकीय अधिकारी त्रिवेंद्र कटरे यांनी घटनास्थळी जखमींवर प्राथमिक उपचार केले. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक सोडून पसार झाला. घटनास्थळी पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल गजानन कोंडागुर्ले यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.दुसऱ्या एका अपघातात कढोली व वाढोणा येथून वैरागड मार्गे भूईमुगाच्या शेंगा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना कढोली गावाजवळील वळणावर दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कढोली येथील एकनाथ सोनुले यांचा ट्रॅक्टर क्र. एमएच-३३-२२०८ ने कढोली वाढोणा येथील शेतकऱ्याच्या भूईमुगााच्या शेंगा आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात येत होत्या. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचे वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात नथ्थू नारनवरे (६५) रा. कढोली, श्यामसुंदर गरमळे (४५) रा. वाढोणा, चिमन बहारदेवे (२५) रा. कढोली हे गंभीररित्या जखमी झाले तर इतर सहा जणांनी ट्रॅक्टर ट्रॉलीवरून उडी घेतल्याने ते बचावले. जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. बी. बच्चलवार, उपनिरीक्षक दाभाडे, हवालदार देवराव सहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)