सिरोंचा महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:25 PM2017-08-23T23:25:57+5:302017-08-23T23:26:23+5:30

सिरोंचा महामार्गावरून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक काही दिवसांपासून वाढली आहे.

Sironcha highway disturbance | सिरोंचा महामार्गाची दुरवस्था

सिरोंचा महामार्गाची दुरवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देदुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : सिरोंचा महामार्गावरून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक काही दिवसांपासून वाढली आहे. या वाहतुकीमुळे मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता पूूर्णत: उखडलेला आहे. खड्डे चुकविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सिरोंचा महामार्गावरील निमलगुडम ते गोलाकर्जी व रेपनपल्ली ते जिमलगट्टापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर खड्ड्यांची रूंदी व खोली दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून वाहनधारकांची दिशाभूल होत आहे.
खड्ड्यांमुळे या मार्गावर अपघातही वाढ झालेली आहे. सिरोंचा जवळील कालेश्वर-सिरोंचा यांना जोडणाºया पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून सदर मार्गावरून जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी येथील मार्ग दिवसेंदिवस उखडत आहे. २४ तास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावर किरकोळ व मोठ्या अपघातही वाढ झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा करण्यात आली. परंतु नागरिकांच्या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी नागरिक त्रस्त आहेत.
खड्ड्यांमुळे होतो विलंब
सिरोंचा महामार्गावर मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. निमलगुडम ते गोलाकर्जी हे केवळ ४ किमीचे अंतर आहे. व रेपनपल्ली ते जिमलगट्टा हे केवळ १२ किमीचे अंतर आहे. परंतु या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने सदर अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना जवळपास दीड ते दोन तास लागतात. अत्यंत कमी वेगात वाहन चालवावे लागते. परिणामी नागरिकांचा वेळही वाया जात आहे.

Web Title: Sironcha highway disturbance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.