शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सिराेंचाने जपला ब्रिटिशकालीन इमारतींचा वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

सिराेंचा येथे पूर्वी नवाबांचे राज्य हाेते. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळातही हे शहर ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीचे हाेते. दंडकारण्यातील हा प्रदेश ...

सिराेंचा येथे पूर्वी नवाबांचे राज्य हाेते. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळातही हे शहर ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पसंतीचे हाेते. दंडकारण्यातील हा प्रदेश विकसित हाेता. येथे अनेक इमारती, धार्मिक स्थळे, सामाजिक केंद्रे अजूनही अस्तित्वात आहेत. सिराेंचा हे प्राणहिता नदीच्या काठी वसले आहे. तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे इतकी मजबूत आहेत की त्यांच्या निर्मितीची कला वाखाणण्याजाेगी आहे. शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, वली हदरशाह दर्गा, आसरअल्ली मार्गावरील चर्च, धार्मिक स्थळे शतकाहूनही जुनी आहेत. सिराेंचातील विश्रामगृह, सोमानापल्लीचे विश्रामगृह, कोप्पेलाचे विश्रामगृह हे सर्व ब्रिटिश काळात बांधले गेले. मात्र यापैकी कोप्पेलाच्या विश्रामगृहाची जाळपोळ माओवाद्यांंनी करून नासधूस केली. विशेष म्हणजे काही इमारती आता सरकारी कार्यालये म्हणून वापरली जात आहेत. त्यापैकी पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, रिक्रिएशन क्लब (सध्याचे दूरदर्शन केंद्र), जुना दवाखाना भवन, हवामान केंद्र, चिट्टूर रेस्ट हाऊस, एफडीसीएमची इमारत या सर्व इमारती ही ब्रिटिशकालीन वारसा आहेत. काही इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इमारतींचे नूतनीकरण करून त्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यात शेतकरी भवन, कृषी गोडावून, पाटबंधारे विभागाचे क्वाॅर्टर आणि आसरअल्ली रोडवरील वीज उपकेंद्रासमोर असलेल्या दुमजली इमारतीचा समावेश आहे. प्रशासन त्यांचे नूतनीकरण करून वापर करू शकते.

बाॅक्स

पर्यटनाला वाव

सिराेंचा तालुक्यात बरीच नैसर्गिक केंद्रे असून, ती पर्यटन क्षेत्रे म्हणून विकसित आणि वापरता येतील. यामध्ये सोमनूरचा संगम, बामणीचा धबधबा (धबधबा), पातगुडाम ते कोरलादरम्यान नदीतील खडकांची मालिका, जितम धबधबा यांचा समावेश आहे. तेलंगणा राज्याने आपल्या भागातील धार्मिक, नैसर्गिक क्षेत्र विकसित करून पर्यटक आणि भाविकांसाठी उघडे केले आहे. त्या आधारावर मिळणारा महसूल वर्षाकाठी कोटींमध्ये असल्याची माहिती आहे. केंद्रांच्या विकासाचा फायदा तेथील ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार सिराेंचा तालुक्यातील पर्यटनाला वाव मिळाल्यास राेजगार उपलब्ध हाेऊन विकास हाेऊ शकताे. मात्र याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.