साहेब, आतातरी आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:38+5:30

गडचिराेली जिल्हास्तरावर दाेन शासकीय रुग्णालये आहेत. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय हिवताप, कुष्ठराेग निर्मूलन व आराेग्य क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांमध्येही हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार आदेश दिला जाताे.

Sir, pay our salary quickly and regularly from now on | साहेब, आतातरी आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे

साहेब, आतातरी आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत आराेग्य सेवा बळकट करण्यासाठी गडचिराेली जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपात डाॅक्टरांसह जवळपास दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कंत्राटी कर्मचारी गडचिराेली जिल्ह्यात आराेग्य सेवा देत आहेत. मात्र, त्यांचे वेतन नियमित हाेत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, साहेब, आमचे वेतन लवकर व नियमित द्या हाे, असा टाहाे कर्मचारी फाेडत आहेत. 
गडचिराेली जिल्हास्तरावर दाेन शासकीय रुग्णालये आहेत. तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, तर नऊ ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांमध्ये राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय हिवताप, कुष्ठराेग निर्मूलन व आराेग्य क्षेत्राशी संबंधित इतर प्रकल्पांमध्येही हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ११ महिन्यांचा करार आदेश दिला जाताे. करार संपल्यानंतर दाेन दिवसांचा खंड देऊन नवीन आदेश दिला जाताे. 
गडचिराेली येथील दाेन्ही शासकीय रुग्णालयात कंत्राटी डाॅक्टर व आराेग्य कर्मचारी सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल या दाेन महिन्यांचे वेतन अजूनही मिळाले नाही. आधीच या कर्मचाऱ्यांना मानधन कमी आहे. तेही नियमित व लवकर मिळत नसल्याने हे कर्मचारी आर्थिक अडचणींमुळे चिंताग्रस्त दिसून येत आहेत.  जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेतनाबाबतची कार्यवाही गतीने हाेण्यासाठी नियाेजन करण्याची गरज आहे. 

एप्रिलच्या वेतनासाठी पुन्हा करावी लागणार प्रतीक्षा

-    शासनाकडून जि. प. प्रशासनाला राष्ट्रीय आराेग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीचे अनुदान मिळाल्याने प्रलंबित असलेले मार्च या एका महिन्याचे वेतन हाेणार आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
-    आराेग्य विभागात विविध पदे रिक्त आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, नर्स, सफाई कामगार आदींसह अनेक पदांचा समावेश आहे. रिक्त पदांवर एनआरएचएम कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

जि. प.ला उशिरा अनुदान प्राप्त
राष्ट्रीय आराेग्य अभियानातील कार्यरत डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जि. प.च्या आराेग्य विभागाला शासनाकडून अनुदान मिळत असते. गेल्या दाेन महिन्यांपासून यासाठीचे अनुदान प्राप्त न झाल्याने वेतन प्रलंबित राहिले. अलीकडेच जि. प.ला यासाठीचे अनुदान प्राप्त झाले असल्याने येत्या तीन ते चार दिवसांत कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती जि. प.च्या सुत्रांकडून मिळाली आहे. 

 

Web Title: Sir, pay our salary quickly and regularly from now on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर