आरमाेरी : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेळी पालनाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कृषी क्षेत्रात भर पडणार नाही,असे प्रतिपादन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कापगते यांनी केले.
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा आयोजित आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या वतीने १ ते १० फेब्रुवारीपर्यंत दहा दिवशीच शेळी पालन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा समाराेप करण्यात आला. कार्यक्रमाला समन्वय हेमंत मेश्राम, व्ही. डी. काटकर, भास्कर सेलोकर व ३५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
१ फेब्रुवारीला प्रशिक्षणाचे उद्घाटन आरसेटीचे संचालक चेतन वैद्य यांच्या हस्ते झाले. दहा दिवशीच प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून चामोर्शीचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कापगते, कांचन नंदनवार, उमेदचे गोविंदा राऊत उपस्थित हाेते. समारोपीय कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी भास्कर सेलोकर, गणेश मातेरे व नागरिकांनी सहकार्य केले.