शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी रंगभूमी झाली आता व्यावसायिक

By admin | Updated: October 26, 2014 22:40 IST

झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या

वैरागड : झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या तारखा घेणे, आपले कमिशन ठेवून नटनट्यांचे रेटबोर्ड तयार करण्याचे काम या नाटकाच्या दिग्दर्शकाकडे असते. सिनेमा व मालिकेतील नावाजलेले कलावंत चार-पाच मित्र मंडळी गोळा करून लोकांना आकर्षीत करणारे बॅनर, पोस्टर लाऊन आमच्याकडे उत्कृष्ट नाटकाचे प्रयोग उपलब्ध असल्याचे फलक लावून नाटकाच्या तारखा निश्चित करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. सध्या कलेचे मोल पैशाने ठरत असून झाडीपट्टी रंगभूमी व्यावसायिक बनली असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी काही वर्ष मोजक्याच नाट्यप्रयोग सादर करणारे मंडळे होती. तेव्हा या नाट्यप्रयोगातील कलाकारांचा दर्जा उत्तम होता. पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात झाडीपट्टीच्या नाटकाला अधिक पसंती आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुळशी विवाह आटोपल्यानंतर गावागावात मंडई भरविण्याची प्रथा आजही कायम आहे. दिवसा मंडई आणि रात्री मनोरंजनासाठी नाट्य प्रयोगाचे आयोजन करणे हे नित्याचेच झाले आहे. सध्या नाट्यप्रयोगाचा खर्च ४० ते ५० हजारापर्यंत आहे. सदर खर्च परवडण्यासारखा नाही. तिकीट आकारून जमा केलेले सर्व पैसे नाट्यमंडळाच्या घशात जातात. सध्या होत असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्यप्रयोगामधून फारसे समाजप्रबोधनही होत नाही. याशिवाय आता शहरातील झाडीपट्टी नाट्यमंडळांवर छत्तीसगडी धमाक्याने अवकळा आली आहे. दंडार, तमाशा या लोककलेच्या प्रकारातून झाडीत जन्माला आली म्हणून ती झाडीपट्टीची रंगभूमी होय. पूर्वी ध्वनीक्षेपकाची सोय नसतांनासुद्धा दिवाबत्तीच्या उजेडात प्रेक्षक दंडार, तमाशा या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे. झाडीपट्टी रंगभूमीचे दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहे. गावात एकदा नाट्यप्रयोग झाला की, त्याचे स्मरण अनेक दिवस टिकून राहायचे. आता मात्र नाट्य मंडळाच्या भाऊगर्दीत व पैसा कमविण्याच्या नादात केवळ मनोरंजनावरच भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या नटाला कायम स्मरणात ठेवणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)