स्पर्धांनी रंगला श्रावण सोहळा
By Admin | Updated: August 24, 2014 23:30 IST2014-08-24T23:30:45+5:302014-08-24T23:30:45+5:30
सखींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने स्थानिक साई मंदिरात श्रावण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात समूह नृत्य स्पर्धा,

स्पर्धांनी रंगला श्रावण सोहळा
गडचिरोली : सखींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने स्थानिक साई मंदिरात श्रावण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात समूह नृत्य स्पर्धा, गीतगायन, फुगडी स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समूह नृत्य स्पर्धेत टेप्पलवार गु्रप तर गीतगायन स्पर्धेत अंजली देशमुख या प्रथम आल्या.
कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सखींनी सामूहिक प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी उल्हास नरड होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून माधुरी दहीकर, वंदना मुनघाटे, मोहिनी खुणे, विजया चव्हाण, सोनिया बैस, रश्मी आखाडे, सखी संयोजिका प्रीती मेश्राम उपस्थित होत्या. सर्वप्रथम गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली देशमुख, द्वितीय देवला बानबले, तृतीय क्रमांक भारती गुलाब मडावी, यांनी तर प्रोत्साहनपर बक्षीस उषा वामन भानारकर यांनी पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक म्हणून ३०१, २०१, १०१ व प्रोत्साहनपर १०१ रूपयाचे बक्षीस सोनिया बैस यांच्याकडून देण्यात आले.
समूह नृत्य स्पर्धेत ज्योत्स्ना टेप्पलवार, अर्चना चन्नावार, सीमा आयतुलवार, सपना बोमनवार यांच्या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय लता देवाळकर, संगीता नवघडे यांच्या ग्रुपने तर तृतीय क्रमांक पीयूषा समर्थ, नेहा चन्नावार यांच्या ग्रुपने पटकाविला.
विजेत्यांना रवि चन्नावार यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेेत प्रथम क्रमांक वंदना दरेकर, पुष्पा पाठक, द्वितीय मृणाली मेश्राम, जयश्री चांदेकर तर प्रोत्साहनपर बक्षीस चन्नावार, संगीडवार, सपना बोमनवार, अर्चना मुनगंटीवार यांनी पटकाविले. किरण नमुलवार, मीना नेवलकर, वृंदा लांजेवार, उप्परवार, प्रणाली न्यालेवार, वैशाली संगीडवार, बोमनवार यांनी ढोकला, लाडू, चकली, साबुदाणा वडा, आप्पे, गुपचूप, पिंगर, बटाट्याची भाजी आदी पदार्थाचे स्टॉल लावून मेळाव्याची रौनक वाढविली.
गीतगायन स्पर्धेचे परीक्षण विजया चव्हाण, नृत्य स्पर्धेचे परीक्षण प्रतिभा रामटेके यांनी केले. दरम्यान डॉ. मोहिनी खुणे यांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सखी सदस्यांना मार्गदर्शन केले. गीतगायन, नृत्य स्पर्धेचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार प्रीती मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवि स्टील सेंटर, सोनिया बैस, मृणाल उरकुडे, भारती खोब्रागडे, मंगला बारापात्रे, अर्चना भांडारकर, शारदा खंडागडे, कल्पना लाड, उज्वला साखरे, रोहिनी मेश्राम यांच्यासह सखी सदस्यांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)