शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराने केली ग्राहकाची हत्या

By admin | Updated: September 24, 2014 23:34 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी राजू दशरथ गांगरेड्डीवार (४५) याला मंगळवारी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.गणपती लच्छमा भोयर रा. गुड्डीगुडम असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गणपती लच्छमा भोयर हा इसम राजू दशरथ गांगरेड्डीवार यांच्या गावातील किराणा दुकानात १० रूपयांची फाटकी नोट घेऊन २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास किराणा साहित्य घेण्यास गेला होता. दरम्यान, भोयर व गांगरेड्डीवार या दोघांमध्ये १० रूपयाच्या फाटक्या नोटेवरून वाद झाला. आरोपी राजू गांगरेड्डीवार याने दुकानात असलेल्या लाकडी दांड्याने भोयर यांच्या पोटावर व गुप्तांगावर वार केला. यात भोयर हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याचा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मृतक गणपती भोयर हा एकटाच राहत असून मोलमजुरी करून वास्तव्य करीत होता. गणपती भोयर याची पत्नी इमला गणपती भोयर (४२), मुलगा नागेश गणपती भोयर (२२), विवाहित मुलगी राजेश्वरी तमय्या पाले व श्रीदेवी रमेश चिलकाटील हे तिघेजण गणपतीशी पटत नसल्याने आसरअल्ली येथे राहत होते.घटनेप्रसंगी नातेवाईक विलास व्यंकटी भोयर, गंगाराम लच्छमा गावतुरे, मृतकाचा भाऊ बापू अंकलू भोयर व गुड्डीगुडम येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर घटनेची तक्रार राजाराम खांदला येथील उपपोलीस ठाण्यात मुलगा नागेश गणपती भोयर यांनी २२ सप्टेंबर रोजी दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी राजू गांगरेड्डीवार याचेवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. मृतदेहाचे अहेरी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)