शिवपांदणलगतचा बंधारा दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:20 IST2017-12-26T00:20:28+5:302017-12-26T00:20:43+5:30
शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून .....

शिवपांदणलगतचा बंधारा दुर्लक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शेतकऱ्यांना पुरेशी सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देसाईगंज तालुक्यातील कुरुड-कोंढाळा शिवपांदणलगत लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी पर्याप्त सोयीच उपलब्ध करून देण्यात न आल्याने शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. सदर बंधारा अद्यापही दुर्लक्षित असल्याने संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कुरुड कोंढाळा शिवपांदण रस्त्यालगत १९९५ मध्ये कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याच्या माध्यमातून लगतच्या शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पाणी अडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने सदर बंधारा कुचकामी ठरला आहे. योग्य नियोजनाअभावी शासनाचे लाखो रुपये व्यर्थ खर्च झाले आहेत.
सदर बंधाºयाचे नुतनीकरण करण्यासाठी २००३ मध्ये पुन्हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्याऐवजी कार्यारंभ आदेशात बंधाºयावर स्लॅब टाकण्याचे कुठलेही नियोजन नसताना कार्यारंभ आदेश व अंदाजपत्रकाला बगल देत संबंधित विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बांधकामाच्या निधीची अफरातफर केली. त्यामुळे सदर बंधारा बांधकामातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध न झाल्याने निरूपयोगी ठरला आहे.
बंधाºयालगतचे खोलीकरण केल्यास व पाणी अडविण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यास सदर बंधारा शेतकºयांसाठी वरदान ठरू शकतो. या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती कोंढाळा ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. बांधकामाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.