शेडनेट हाऊसमुळे नियंत्रित पिके घेता येतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:11+5:302021-04-08T04:37:11+5:30
गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाऊस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. याद्वारे तालुक्यातील कोपरअल्ली येथील शेतकरी रवींद्र ...

शेडनेट हाऊसमुळे नियंत्रित पिके घेता येतात
गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा तालुक्यात प्रथमच शेडनेट हाऊस हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. याद्वारे तालुक्यातील कोपरअल्ली येथील शेतकरी रवींद्र ताती यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शेडनेटच्या माध्यमातून बंदिस्त वातावरणात कोणतेही पीक कोणत्याही वेळेत घेता येणे शक्य होईल. यापूर्वी याच प्रकल्पातून थंड हवामानात येणारी स्ट्राॅबेरी पिकाचे उत्पादन मुलचेरा तालुक्यात घेण्यात आले. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
बाॅक्स
...असे आहे अर्थसाहाय्य
शेडनेट उभारणीसाठी विशेष केंद्रीय साहाय्य योजनेतून नंदनवन शेती संकल्पना राबविली जात आहे. याअंतर्गत मुलचेरा तालुक्यात ३ शेडनेटसाठी मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी एक शेडनेट पूर्णत्वास आलेले आहे. एका शेडनेटसाठी सात लाख रुपये खर्च येताे. यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला एक लाख रुपये भरावे लागतात. त्यानंतरचे अनुदान शासनाकडून प्राप्त हाेते. काेपरअल्ली येथे तयार केलेले शेडनेट १,०१२ स्क्वेअर मीटरचे आहे.