शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

शापोआ कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: June 20, 2015 02:16 IST

अत्यल्प मानधनात शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष ...

मुलचेरात गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : मानधन वाढ त्वरित लागू करा
मुलचेरा : अत्यल्प मानधनात शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता आयटकच्या नेतृत्त्वात कर्मचाऱ्यांनी बुधवारी मुलचेरा पंचायत समितीसमोर तीव्र निदर्शने केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी हेडाऊ यांच्याशी समस्यांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
शालेय पोषण आहार कर्मचारी मागील १४ वर्षांपासून ग्रामीण व नगर परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम तसेच शाळा उघडणे तसेच शाळेची देखरेख, स्वच्छता व इतर कामे प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांना चपराशी कम कुक या पदावर नेमून १५ हजार प्रतिमाह वेतन द्यावे, जुन्या स्वयंपाकी महिलांना कामावर ठेवावे, नवीन अतिरिक्त कर्मचाऱ्यांना निवडीच्या प्रकारावर पायबंद घालावा, ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे मानधन व इंधन बिल त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, स्वयंपाकी महिलांचे अद्यापही मानधन वाढले नाही, मागील हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाच ते साडेसात हजार मानधन वाढीचे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही. पोषण आहार कर्मचाऱ्यांना पोषण आहार शिजविण्याव्यतिरिक्त कामे देऊन नयेत, दिल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला द्यावा, प्रत्येक गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, वयाच्या ६० वर्षानंतर किमान तीन हजार पेंशन देण्यात यावे, तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून इंधन बिल प्राप्त झाले नाही. त्यामुळे ते त्वरित द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष विनोद झोडगे, पौर्णिमा मालाकार, किशोर सुनतकर, सुमित्रा घोष हजर होत्या. (तालुका प्रतिनिधी)