शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सीसी राेडवरून वाहणार सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील विवेकानंद नगरात काही ठिकाणी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र नाली बांधकामाला ...

गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहरातील विवेकानंद नगरात काही ठिकाणी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र नाली बांधकामाला बगल देऊन सिमेंट काॅंक्रिट राेडचे काम केले जात आहे. त्यामुळे सीसी राेडवरून सांडपाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषद प्रशासनाच्यावतीने नगराेत्थान, रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण, दलितवस्ती यासह विविध याेजनेतून सिमेंट काॅंक्रिट रस्ते, नाली, छाेटे पूल, रपटे आदी कामे सुरू आहेत. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात गडचिराेली शहरातील विकासकामे ठप्प झाली हाेती. शिवाय रेतीच्या तुटवड्यामुळे शासकीय व खासगी कामे प्रभावित झाली हाेती. मात्र आता शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून विकासकामात काही प्रमाणात गती आली आहे.

न. प. प्रशासनाच्यावतीने विवेकानंदनगरात किराणा दुकानासमाेरील रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. खासगी कंत्राटदाराच्यावतीने काम करण्यात आले आहे. या राेडलगत एकाच बाजूला पक्क्या स्वरूपाची नाली यापूर्वीच बांधण्यात आली आहे. ही नाली किराणा दुकानाच्या बाजूने आहे. मात्र दुसऱ्या बाजूने नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून एका बाजूने नाली नसल्याने सांडपाणी वाहून जाण्याची माेठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी येथे काडीकचरा तसेच सांडपाणी साचून राहत असल्याने लगतच्या कुटुंबांना दुर्गंधीचा त्रास हाेत आहे. सातत्याने मागणी करूनही न. प. प्रशासनाने येथे नालीचे बांधकाम केले नाही. रस्त्यापूर्वी नाली बांधण्याची आवश्यकता हाेती. मात्र प्रशासनाने नाली बांधकामाला बगल देऊन सीसी राेडचे काम हाती घेतले आहे.

बाॅक्स ....

अनेक ठिकाणी मूलभूत समस्या कायम

शहरातील विवेकानंद वाॅर्डाला झाेपडपट्टी वाॅर्ड म्हणून ओळखले जाते. छाेट्या-माेठ्या राेजगारासाठी तसेच पाेटाची खळगी भरण्यासाठी शहराच्या बाहेरून अनेक कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले. पाहता-पाहता या वाॅर्डात घरांची संख्या वाढली. काही ठिकाणी विकासकामे झाली आहेत. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी पक्के रस्ते, नाली आदी सुविधांचा अभाव आहे.