लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:17+5:302021-04-08T04:37:17+5:30
गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली असून ही लाट थाेपविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत. ...

लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर
गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली असून ही लाट थाेपविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत. साेबतच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण माेहिमेला वेग देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डाेज मिळून ४८ हजारवर नागरिकांनी लसीकरण केले आहे. लसीकरण माेहिमेत तरूणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे दिसून येते.
गडचिराेली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग मिळून एकूण ६७ काेराेना लसीकरण केंद्र आहेत. या सर्व केंद्रांवरून लसीकरणाची माेहीम सुरू आहे. जिल्ह्यात १० हजार ७८६ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाच्या पहिल्या डाेजचा लाभ घेतला तर १० हजार १६३ ज्येष्ठ नागरिकांनी दुसरा डाेज घेतला आहे.
लसीकरणासाठी हेल्थकेअर वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक पुढे येत आहेत. ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांनी काेविड लसीकरण करून घ्यावे, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार सांगितले जात आहे. काही सुज्ञ नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले. काेविडचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या जात आहेत.
बाॅक्स...
ग्रामीण भागात उत्साह अधिक
काेराेना लसीकरणासाठी ग्रामीण भागातील नागरिक अधिकाधिक पुढे येत असून त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. शहरी भागातील लाेक काेविड लसीकरण करून घेत असले तरी त्यांच्या मनावर थाेडीशी भीती असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात कार्यरत आराेग्य विभागाचे कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी उत्साहीपणे काेविड लसीकरण करून घेत आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात शासकीय चार व खासगी दाेन अशा सहा ठिकाणी काेविड लसीकरणाची व्यवस्था आहे. लाेकांचा अधिकाधिक संपर्क येणाऱ्या व्यक्तींनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
बाॅक्स...
गडचिराेली तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण अधिक
-काेविड लसीकरणात गडचिराेली शहर व तालुका आघाडीवर आहे. दाेन्ही डाेज मिळून आतापर्यंत तालुक्यात एकूण ८ हजार ३०९ जणांनी काेराेनाची लस घेतली. आराेग्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, पत्रकार आदींनी तालुक्यात लस घेतलेली आहे.
-जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली आराेग्य विभागाचे अधिकारी लसीकरण माेहिमेवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांना यशस्वीरित्या लस देत आहेत.
काेट..
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, झाला तरी त्याचा फारसा परिणाम आराेग्यावर हाेणार नाही, याकरिता लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गडचिराेली जिल्ह्यात एकूण ६७ लसीकरण केंद्र असून या केंद्राच्या माध्यमातून माेहीम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक व ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी केंद्रावर जाऊन काेविड लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ.समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी, गडचिराेली