ज्येष्ठ नागरिक समाजाचे मार्गदर्शक
By Admin | Updated: May 10, 2017 01:40 IST2017-05-10T01:40:23+5:302017-05-10T01:40:23+5:30
ज्येष्ठ नागरिकांनी जीवन जगताना अनेक अनुभव घेतलेले राहतात. या अनुभवाचा गाठोळा त्यांच्याकडे जमा झाला राहतो.

ज्येष्ठ नागरिक समाजाचे मार्गदर्शक
एस. टी. सूर यांचे प्रतिपादन : ज्येष्ठांचे ‘मूलभूत कर्तव्य व अधिकार’ यावर मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांनी जीवन जगताना अनेक अनुभव घेतलेले राहतात. या अनुभवाचा गाठोळा त्यांच्याकडे जमा झाला राहतो. त्यांच्या अनुभवांचा फायदा समाजाला होण्यास मदत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश-२ एस. टी. सूर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या वतीने ९ मे रोजी मूल मार्गावरील न्याय सेवा सदन येथे ज्येष्ठ नागरिकांचे मूलभूत कर्तव्य व अधिकार या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश एस. टी. सूर होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव रो. बा. रेहपाडे, सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा न्याय दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) सु. म. बोमीडवार, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर) तथा न्याय दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) एम. आर. बागडे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाडे, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन व आभार नरेंद्र लोंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.