गडचिराेली : डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाच्या कार्यकारी परिषद सदस्य तथा यशाेदीप संस्थेच्या सचिव स्नेहा हरडे यांना गाेंडवाना विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली. स्नेहा हरडे यांनी कुरखेडाच्या गाेविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे डाॅ. अनिल भाेयर यांच्या मार्गदर्शनात लायब्ररी सायन्स विषयात ‘आदिवासीबहुल माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या वाचन सवयींचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला.
लतीफ शेख
गडचिराेली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे देसाईगंज शहर अध्यक्ष लतीफ जब्बार शेख यांची नामदार नवाब मलीक विचार मंचच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मंचचे संस्थापक अध्यक्ष रहेमान पठाण यांनी त्यांची नियुक्ती केली. लतीफ शेख यांनी नियुक्तीचे श्रेय आ. धर्मरावबाबा आत्राम, प्रदेश संघटक युनुस शेख, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना दिले.