पांढरा गूळ भरलेला ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:15 IST2019-04-22T00:15:23+5:302019-04-22T00:15:54+5:30
आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

पांढरा गूळ भरलेला ट्रक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता हे आलापल्ली येथील मुख्य चौकातून जात असताना एका किराणा दुकानासमोर एमएच-३४-बीजी-०५२९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये पांढरा गुळ असल्याचे दिसून आले. गुप्ता यांनी याबाबतची माहिती अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन चौकशी केली असता ट्रकमध्ये पांढरा गूळ आढळून आला. त्यानंतर गूळ भरलेला ट्रक पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला.
दारू गाळण्यासाठी गुळाचा वापर करण्यात येतो. परंतु पांढरा गूळ जप्त केल्यानंतर कारवाई करताना अडचण निर्माण होते. सदर गुळाची विक्री दुकानदार रोज किती करतो, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अहेरी उपविभागात अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात उधान आले आहे. मुक्तिपथच्या सहकार्याने गावागावातील महिला दारूभट्ट्यांवर धाड टाकून त्या उद्ध्वस्त करीत आहेत. ट्रकभर गूळ जप्तीच्या कारवाईमुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.