शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २२ जणांची झाली गुप्त सभा

By admin | Updated: May 5, 2016 00:08 IST

१५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ट्रॅक्टर अपघात प्रकरण : तडजोडीसाठी रकमेची केली मागणीदेसाईगंज : १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणातील खऱ्या रहस्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाली असल्याने पोलीस आपल्याला कधीही अटक करू शकतात, त्यामुळे पोलिसांशी तडजोड करण्यासाठी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी प्रत्येकाकडून सात हजार रूपये वसूल करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. शिवाय या बैठकीच्या चर्चेबाबत कुठे वाच्चता केल्यास बघून घेण्याची धमकीसुद्धा मुख्य सूत्रधाराने बैठकीत २१ जणांना दिली.सदर ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी यातील २१ जणांनापैकी एकाने जरी गडबड केल्यास व मला अटक झाल्यास सर्वांनाच या प्रकरणात पोलिसांमार्फत अडकविणार, अशी तंबी मुख्य सूत्रधाराने सभेत सर्वांना दिली. १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये एकूण २२ जण बसले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. यापैकी ३ मे रोजी चार जणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केल्याची माहिती आहे. १५ एप्रिल रोजी ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात उमाकांत बांबोळे व विजय आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला, असे भासविण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तळाशी जाऊन तपास न करता मृतदेहाचे शव विच्छेदन केले. त्यानंतर चोप, कोरेगाव, शंकरपूर परिसरात वेगळीच चर्चा सुरू झाली. अपघातानंतर उमाकांत बांबोळे याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मागे बसलेला विजय आत्राम गंभीर जखमी झाला. दरम्यान अपघाताची माहिती होऊ नये म्हणून तीन ते चार जणांनी आत्राम याला फावडे, सबल व लाठी काठ्यांनी ठार मारल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मृतक बांबोळेच्या साहित्याच्या रकमेच्या वाटपातून काहींना हिस्सा न मिळाल्याने या प्रकरणातील खरे रहस्य पुढे येत असल्याचे दिसते. (वार्ताहर)