शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी माध्यमिक शिक्षकांना झिजवावे लागणार नागपूरचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2022 05:00 IST

गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत. परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चंद्रपूर, गडचिराेली व वर्धा या तीन जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षकांना न्याय देण्यासाठी चंद्रपूर येथे शाळा न्यायाधीकरण आहे. मात्र, हे न्यायाधीकरण बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय मागण्यासाठी नागपूरच्या न्यायाधीकरणात जावे लागणार आहे. नागपुरात जाऊन न्याय मागण्यासाठी शिक्षकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे.   महाराष्ट्र खासगी शाळा अटी व शर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ अंतर्गत खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा मुक्त, बडतर्फ, पदानवत आणि सेवाज्येष्ठता डावलून दिलेल्या पदोन्नतीच्या आदेशांविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी शाळा न्यायाधीकरणाची स्थापना झालेली आहे. सन १९९८ मध्ये चंद्रपूर येथे अतिरिक्त शाळा न्यायाधीकरण सुरू केले. त्यावेळी चंद्रपूर शाळा न्यायाधीकरणात भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली असे एकूण पाच जिल्हे होते. त्यानंतर २००६-२००७ मध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचे अधिकार क्षेत्र चंद्रपूर येथून काढून, नागपूर शाळा न्यायाधीकरण येथे बहाल करण्यात आले. तेव्हापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत.परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना  त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाढेल. शाळा न्यायाधीकरणात दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांच्या समस्यांची संख्या वाढत आहे. त्यातही न्याय मिळण्यास बरेच वर्ष प्रकरण प्रलंबित राहत आहेत.  न्याय मिळेपर्यंत नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार आहे. 

संस्थाचालक शिक्षकांची पिळवणूक करीत असल्याने शिक्षकांकडून दाखल तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपूर येथे २५ हजार रुपयांत वकील उपलब्ध हाेत हाेता. नागपुरात वकिलासाठी लाखाे रुपये माेजावे लागणार आहेत. तीन जिल्ह्यांसाठी चंद्रपुरात न्यायाधीकरण असूनही सात ते आठ वर्षांशिवाय शिक्षकांना न्याय मिळत नव्हता. आता किती वर्ष लागतील हे सांगणे अशक्य आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी चंद्रपूर न्यायाधीकरणासाठी प्रयत्न करावा. - संताेष सुरावार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र