शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी तालुक्यात दुसऱ्यांदा कापूस बियाण्यांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी  हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या  अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राकेश सडमेकच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरी दहा पोत्यांमध्ये भरून ठेवलेले कुठलेही वेष्टण /पॅकिंग नसलेले अवैध ४३० कि.ग्रॅ. खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्याची किंमत ७ लाख ४१ हजार ५११ रुपये हाेते.

ठळक मुद्देसात लाखांचे बियाणे जप्त, गेर्रा येथे कारवाई; मुख्य आराेपी झाला फरार

लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील गेर्रा येथील एका घरी छापा टाकून पोलीस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने ७ लाख ४१ हजार ५११ रुपये किमतीचे अनधिकृत बीटी कापूस बियाणे जप्त केले. आठवडाभराआधी तालुक्यातील आपापल्ली येथून  २३ लाख ६४ हजार ४७२ रुपयांचा बीटी बियाणे जप्त केले होते. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर बीटी बियाणांचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
गेर्रा येथील राकेश सडमेक यांच्या घरी  हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती पोलीस विभाग व कृषी विभागाच्या  अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राकेश सडमेकच्या घरी धाड टाकली. त्याच्या घरी दहा पोत्यांमध्ये भरून ठेवलेले कुठलेही वेष्टण /पॅकिंग नसलेले अवैध ४३० कि.ग्रॅ. खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्याची किंमत ७ लाख ४१ हजार ५११ रुपये हाेते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, सदर साठा पूर्णपणे अवैध  व विनापरवाना शासन मान्यता नसलेला आढळला. हे बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी असण्याची शक्यता आहे. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन अहेरी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. 
या प्रकरणातील मुख्य आराेपी राकेश सडमेक हा फरार आहे. त्याच्या विराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आला आहे. 
ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत तसेच पोलीस विभागातील बिट अंमलदार देवीदास मानकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक आरती नरोटे करीत आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती