कृषी विभागाला कात्री
By Admin | Updated: July 23, 2014 23:36 IST2014-07-23T23:36:07+5:302014-07-23T23:36:07+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेचा सन २०१४-१५ चा पुनर्विनियोजन अर्थसंकल्प आज बुधवारी अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती छाया कुंभारे यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. बांधकाम, महिला व

कृषी विभागाला कात्री
जि.प. चा अर्थसंकल्प सादर : बांधकाम व महिला बालकल्याणला भरघोस तरतूद
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचा सन २०१४-१५ चा पुनर्विनियोजन अर्थसंकल्प आज बुधवारी अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती छाया कुंभारे यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. बांधकाम, महिला व बालकल्याण, शिक्षण, सामान्य प्रशासन या विभागासाठी भरगच्च निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसेच सिंचन, समाजकल्याण या विभागासाठी फारशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. याबाबत कृषी सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा परिषद सदस्य अजय कंकडालवार, अमोल मारकवार, काँग्रेसचे गटनेते केसरी पाटील उसेंडी, विश्वास भोवते, अशोक इंदूरकर, प्रतिभा गद्देवार, विजया विठ्ठलानी आदी सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी सभागृहात व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी अतुल भडांगे आदीसह विविध विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)