शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद
By Admin | Updated: July 23, 2014 23:36 IST2014-07-23T23:36:43+5:302014-07-23T23:36:43+5:30
ओबीसी समाजाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी आज बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.

शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद
ओबीसींचे आंदोलन : जिल्हाभरातून ओबीसी संघटनांनी पाठविले शासनाला निवेदन
गडचिरोली : ओबीसी समाजाच्या विविध मागण्या निकाली काढण्यासाठी आज बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात शाळा, महाविद्यालय बंद होते. गडचिरोली शहरात स्थानिक इंदिरा गांधीत चौकात पेसा कायद्याच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. गडचिरोली शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आज सकाळपासूनच बंद होते.
यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात समितीचे अधीक्षक अरूण पाटील मुनघाटे, रमेश भुरसे, प्रा. शेषराव येलेकर, प्रशांत वाघरे, बाबुराव कोहळे, प्राचार्य खुशाल वाघरे, दादाजी चापले, गोविंदराव बानबले, देवराव म्हशाखेत्री, दादाजी चुधरी, राजेंद्र लांजेकर, पांडुरंग घोटेकर, अॅड. संजय ठाकरे, विलास निंबोरकर, रत्नदीप म्हशाखेत्री, पुरूषोत्तम म्हस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, दत्तात्रय खरवडे, गणेश वसू, जगदीश लडके, सुधाकर पेटकर, भास्कर म्हस्के, प्रा. देवानंद कामडी, नामदेव शेंडे, प्रा. विजय दिघडे, पुरूषोत्तम झंझाळ, प्रा. सूर्यकांत भोंगळे आदी उपस्थित होते.
आष्टी येथेही आज ओबीसी समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महेश चौधरी, रवी बोरकुटे, कपील पाल, मंगेश पोरटे, आशिष खरबनकर, राहुल तागडे, गणेश चौधरी, धनराज चापले, प्रकाश बोबाटे यांनी केले.
वैरागड परिसरातील कढोली, वैरागड, मानापूर, देलनवाडी येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. धानोरा येथे ओबीसीच्या या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राखडे महाराज, नानाजी पाल, मुन्ना चंदेल, विलास कोडाप, महादेव गणोरकर, शिवराम चिमुरकर, विनोद लेनगुरे, राकेश खरवडे, गुरूदेव सोनुले, वैभव कोटांगले, सोमाजी गुरनुले आदी उपस्थित होते. रांगी येथे आंदोलनात नरेंद्र भुरसे, नंदू कुनघाडकर, शामराज कुकडकार, दिनेश चापडे, कैलाश चापडे, नितीन कावळे यांनी सहभाग घेतला. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा तालुक्याही चांगला प्रतिसाद मिळाला.