अहेरी उपविभागात शाळा, महाविद्यालय बंद
By Admin | Updated: August 11, 2014 23:55 IST2014-08-11T23:55:26+5:302014-08-11T23:55:26+5:30
पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवळ मंडळ स्थापन करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वरत १९ टक्के करावे यासह विविध मागण्यांसाठी बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने

अहेरी उपविभागात शाळा, महाविद्यालय बंद
अहेरी / एटापल्ली / आलापल्ली / सिरोंचा : पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवळ मंडळ स्थापन करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वरत १९ टक्के करावे यासह विविध मागण्यांसाठी बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने आज सोमवारी अहेरी उपविभागात शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान अहेरी, आलापल्ली, एटापल्ली येथे मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
अहेरी शहरासह तालुक्यातील व्यंकटरावपेठा व अन्य काही गावात बंद पाळण्यात आला. यावेळी संजय पोहणेकर, पृथ्वीराज कोलवार, रवी नेलकुदरी, कृष्णा ठाकरे, अभिषेक दखणे, अमित बेझलवार, अनुराग जाक्कोजवार, स्वप्नील पुल्लूरवार, श्रीशेलम दुडमवार, गुड्डू ठाकरे, सुनील येनमवार, देवेंद्र खतवार, दर्शन भागवतकर, पवन दोनतुलवार, सागर डेकाटे, सुभाष घुटे, जाकीर हुसैन सय्यद यांच्यासह अनेक नागरिक व विद्यार्थी शाळा, कॉलेज बंद आंदोलनात सहभागी झाले होते.
तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथेही पेसा कायद्याच्या विरोधात बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच व्यापारी प्रतिष्ठाणेही बंद करण्यात आले होते. या आंदोलनात माधव राऊत, शामराव राऊत, नंदू चापले, संदीप राऊत, भारत करमे, रमेश राऊत, राजेश राऊत, संतोष चिलमकर, महेश दहागावकर, सोनू आईलवार यांच्यासह बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते. एटापल्ली शहरात सोमवारी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. बाजारपेठही बंद होती. कसनसूर-एटापल्ली व आलापल्ली-चंद्रपूर या दोनही मार्गावर तब्बल ५ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. यावेळी सुरेश बारसागडे, प्रज्वल नागुलवार, राजू जंबोजवार, संजय चरडुके, शिवदास वाढई, सचिन मोतकरवार आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी पेसा कायद्याच्या विरोधात नारेबाजीही केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)