शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय स्वाध्याय पुस्तिका अप्राप्त

By admin | Updated: June 19, 2015 01:38 IST

२६ जूनपासून शाळेला सुरुवात होणार असली तरी बहुतांश तालुक्यांमध्ये स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाही.

सात तालुक्यांतील समस्या : गणवेशाचा निधीही मिळाला उशिरा
गडचिरोली : २६ जूनपासून शाळेला सुरुवात होणार असली तरी बहुतांश तालुक्यांमध्ये स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाही. त्याचबरोबर चवथीचा इंग्रजी, सातवीचा परिसर अभ्यास व सहावीची हिंदीची पुस्तक प्राप्त झाली नाही.
मागील काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व गणवेश उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी उन्हाळभर काम करीत राहतात. शाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होते. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी असलेली भीती कमी व्हावे, त्यांना शाळेत येण्यासाठी आनंद वाटावा, यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
शाळा सुरू होण्याला केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही इयत्ता चवथीचा इंग्रजी, सातवीचा परिसर अभ्यास, सहावीचा हिंदी व सुमारे सात तालुक्यात स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झाल्या नाहीत. अजूनपर्यंत या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या पुस्तका धरून शाळेत जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचे मूल्यांकन करण्यासाठी स्वाध्याय पुस्तिका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र अजूनपर्यंत स्वाध्याय पुस्तिकाही उपलब्ध झाल्या नाहीत. पुस्तका नेमक्या कधी येणार हे अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. सदर पुस्तिका तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)