शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:41 IST

पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.

ठळक मुद्देशाळा बंद करू नका : शिक्षक समितीकडून चौकात जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. शासनाचे हे धोरण अन्यायकारक असून सामान्य जनतेतून याला विरोध व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जनजागृती कार्यक्रम घेतला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्वच मुलांना कोणताही भेदभाव न करता मोफत गणवेश उपलब्ध करून द्यावे, भांडवलदारांच्या नफ्यासाठी शासनाकडून शिक्षणाचे कंपनीकरण केले जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी व जागतिक बँकेच्या दबावाखाली केंद्र शासनाने व अनेक राज्य सरकारांनी कर्मचारी शिक्षकांसाठीची शाश्वत सेवानिवृत्ती वेतन योजना बंद केली आहे. परिभाषित अंशदायी पेंशन योजना आणि राष्ट्रीय पेंशन योजनेच्या अंमलबजावणीमुळे १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत आलेल्या देशभरातील शिक्षक कर्मचाºयांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. शिक्षक कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना लागू करावी, याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमादरम्यान विविध शिक्षकांनी स्वत:ची मते मांडून शिक्षणाची शासन कशी गळचेपी करीत आहे, याचा पाढा वाचला. सदर आंदोलन महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.यावेळी संघटनेचे सरचिटणीस रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, गणेश काटेंगे, योगेश ढोरे, माया दिवटे, अरूण पुण्यप्रेडीवार, अशोक दहागावकर, राजेश बाळराजे, हेमंत मेश्राम, सुरेश नाईक, देवाजी तिम्मा, मेघराज बुराडे, खिरेंद्र बांबोळे, रवींद्र मुलकलवार, डंबेश पेंदाम, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, संजय लोणारे, प्रेमचंद मेश्राम, संगीता लाकडे, राकेश सोनटक्के, रोशनी राकडे, ब्रह्मानंद उईके, दीपक नाकाडे, साईनाथ अलोणे, टार्झन सूरजागडे, प्रशांत काळे, प्रमोद पाल, सुरेश मडावी, अनिल उईके, विलास भांडेकर, दुधराम मोंगरकर, यामिनी कोवे, दिलीप नैताम, राजेंद्र भुरसे, विठ्ठल होंडे, संजय वडेट्टीवार, देवराव दहिकर, संगीता लाकडे, सिद्धार्थ भानारकर, हरीशचंद्र वाघाडे, प्रेमदास दुधबावरे, नरेश गेडाम, दोशहर सहारे, विजय नंदनवार, योगेश वाढई, मोरेश्वर अंबादे, कृष्णा पोहरे, रवींद्र घोंगडे आदी शिक्षक हजर होते.आंदोलनाला अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, लतिफ खॉ पठाण, पांडुरंग पेशने, श्रीकृष्ण मंगर, दिवाकर निंदेकर यांनीही भेट दिली.