नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST2021-02-22T04:25:06+5:302021-02-22T04:25:06+5:30

गडचिरोली : येथे नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान देण्यात आले. गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक यांच्या ...

Save the life of a Chatterjee forest owl trapped in a nylon cat | नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान

नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान

गडचिरोली : येथे नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जीवनदान देण्यात आले. गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक यांच्या निवासस्थानी असलेल्या झाडावर चट्टेरी वनघुबड नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसून आले. याबाबत वन विभाला माहिती देण्यात आली. वन विभागाने पेसा संस्थेच्या सदस्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर लगेच पेसा संस्थेचे अजय कुकडकर, मनोज पिपरे, चेतन शेडे यांनी घटनास्थळी धाव घेत झाडावरील चट्टेरी घुबडाला पकडून नायलाॅन मांजामधून सुटका केली. घुबडाला दुखापत नसल्याने त्याला जंगल परिसरात सोडून जीवनदान देण्यात आले. यावेळी मुकेश लांजेवार, अनिल हुलके, उत्तम हुलके, प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोहचाडे, शेखर म्हशाखेत्री यांनी सहकार्य केले. नायलाॅन मांजावर बंदी असतानाही नायलाॅन मांजाची छुप्या मार्गाने विक्री सुरू आहे. अवैधरित्या नायलाॅन मांजाविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेसा संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.

Web Title: Save the life of a Chatterjee forest owl trapped in a nylon cat