सिरोंचा वनक्षेत्रात सागवान लाकडे जप्त
By Admin | Updated: May 10, 2017 01:31 IST2017-05-10T01:31:47+5:302017-05-10T01:31:47+5:30
तालुक्यातील आसरअल्ली ते सिरोंचा या मार्गावर ३ ते ९ मे दरम्यान २ लाख ५० हजार रूपयांचे सागवान वनाधिकाऱ्यांनी जप्त केले.

सिरोंचा वनक्षेत्रात सागवान लाकडे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली ते सिरोंचा या मार्गावर ३ ते ९ मे दरम्यान २ लाख ५० हजार रूपयांचे सागवान वनाधिकाऱ्यांनी जप्त केले.
वनाधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेडकर यांच्या उपस्थितीत ३ ते ९ मे दरम्यान वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गस्त घालून तस्करांचे सागवान लठ्ठे असरअल्ली - सिरोंचा मागार्पासून जंगलाच्या आत जप्त केले. यामध्ये पाच घन मीटर आकाराचे १० सागवान लठ्ठे आढळून आले. त्यांची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. ही कारवाई क्षेत्र सहाय्यक नवघरे, येनगंटीवार, येरूडे, पारखा, वनरक्षक जेवाजी बानोत, मेश्राम, गावडे, भुरसे, टेकाम, डुरकेवार, ओक्सा, निसार, गेडाम तसेच वनसेवक यांनी केली.