शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड लोहखनिज प्रकल्पाला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली ...

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश : नागपुरात घेतला गडचिरोलीतील समस्या व कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकासात्मक कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागपूर येथे घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवरही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, कृष्णा गजबे, रामदास आंबटकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.या आढाव्याने जिल्ह्यातील रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मेडीगड्डाच्या परिणामांची समितीमार्फत पाहणीलगतच्या तेलंगना राज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवर कार्यवाही होणारभंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार असलेले आणि त्याआधी भंडारा-गोंदियाचे खासदार असलेले नाना पटोले यांचा पूर्व विदर्भातील समस्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे या आढावा बैठकीत विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने नाना पटोले आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सूरजागड लोहखनन प्रकल्प, धान खरेदी, मेडीगट्टा बॅरेज या विषयांवर अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबतची सद्यस्थिती या बैठकीत सांगितली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री