प्रशासनातर्फे देसाईगंज शहरात रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:30+5:302021-04-17T04:36:30+5:30
राज्यासह जिल्ह्यात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी लोकांमध्ये जागृती व्हावी, संचारबंदीचे ...

प्रशासनातर्फे देसाईगंज शहरात रूट मार्च
राज्यासह जिल्ह्यात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी लोकांमध्ये जागृती व्हावी, संचारबंदीचे पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्याने रूट मार्च काढण्यात आला. दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून १ मेच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लावत राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सध्या देसाईगंज तालुक्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच अजूनही कोरोना महामारीचे गांभीर्य नागरिकांनी मनावर घेतल्याचे दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात नियम, अटी व शर्तीचे काटेकोर पालन करण्यासाठी हुतात्मा स्मारक शहरातील मुख्य बाजारपेठ फवारा चौक, थोरात चौक, बसस्थानक रोड मुख्य बाजारपेठ मार्ग बाजार चौकात रूट मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी तिन्ही विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.