शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

लहान झेलियाची वाट अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावाला जाण्यासाठी दोन मोठे नाले पडतात.

ठळक मुद्देगावापर्यंत रस्ताच नाही : नदी, नाले तुडवित गाठावे लागते गाव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहात असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही हे गाव खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचितच आहे.हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावाला जाण्यासाठी दोन मोठे नाले पडतात. नाल्यांवर पूलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी पार करून गावकऱ्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने चारचाकी तर जातच नाही. मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करीत दुचाकी गावापर्यंत पोहोचते. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यात पाणी राहत असल्याने दुचाकीही जात नाही. गरोदर माता किंवा गंभीर स्थितीतील रुग्ण रस्त्याअभावी दगावण्याचा धोका आहे. जिल्हा परिषदेची शाळा आहे. परंतु या ठिकाणी विद्युत नाही. ग्रामपंचायतीने एलईडी टीव्ही दिला आहे. पण विद्युत नसल्याने टीव्ही धूळखात पडून आहे. २०१८ मध्ये विजेचे खांब लावण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत गावात वीज पोहोचली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांनी अजूनपर्यंत विजेचा प्रकाश बघितला नाही. दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशातच रात्र काढावी लागते.गावासभोवताल जंगल असल्याने साप, विंचू यांची भीती आहे. गावाची लोकसंख्या कमी आहे. तसेच गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावात येत नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा