शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

औषधी गोळ्यांचा रस्त्यालगत खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:34 AM

शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाºया औषध म्हणजे आयरन अ‍ॅण्ड फोलिक्स अ‍ॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे.

ठळक मुद्देवैरागडातील प्रकार : रक्ताक्षयाच्या रुग्णांसाठी उपयोगी पडणाऱ्या गोळ्या फेकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : शरीरातील रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या औषध म्हणजे आयरन अ‍ॅण्ड फोलिक्स अ‍ॅसिड गोळ्या रुग्णाला वाटप न करता त्या साठा करून ठेवल्याने मुदतबाह्य झाल्या. दरम्यान सदर गोळ्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार वैरागडात उजेडात आला आहे.रस्त्याच्या कडेला गोळ्या फेकल्याप्रकरणाची वैरागडच्या वैद्यकीय अधिकाºयांनी चौकशी सुरू केली आहे. वैरागड-आरमोरी मार्गावरील रांगी-धानोरा टी-पार्इंटजवळ रक्तक्षय रुग्णांना देण्यात येणाऱ्या गोळ्या व इतर आजारांवरील औषधी रस्त्यावर एका पिशवित बांधून फेकून देण्यात आली होती. आयरन अ‍ॅण्ड फोलिक्स गोळ्या शाळा, महाविद्यालयातून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेवनासाठी दिल्या जातात. ग्रामीण भागात आहारातून मूलभूत अन्नद्रव्य मिळत नाही. त्यामुळे या गोळ्या दवाखान्यात पुरवून प्रत्येक सोमवारी एक गोळी देण्याचा उपक्रम राबविल्या जातो. हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गरोदर व स्तनदा मातांना सुद्धा या गोळ्या आशावर्कर व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून वाटप केल्या जातात. मात्र वैरागडात अशा प्रकारे संबंधित लाभार्थ्यापर्यंत या गोळ्यांचे वाटप न करता त्या मुदतबाह्य झाल्यावर रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. या प्रकाराबाबत रुग्ण व नागरिकांनी प्रचंड नाराजी दर्शविली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आहे.कर्तव्यात कसूर करणारे कर्मचारी कोण?केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गरोदर, स्तनदा माता, बालक व इतर नागरिकांसाठी विविध योजनांतर्गत अनेक आजारांवरील औषधी मोफत पुरविली जाते. राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. मात्र वैरागडसारखा औषधी फेकण्याचा प्रकार यापूर्वीही अनेक ठिकाणी उजेडात आला होता. सदर प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. वैरागडातील या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. मात्र हे कृत्य करणारे व कर्तव्यात कसूर करणारे ते कर्मचारी कोण आहेत, हे शोधून काढण्याचे आवाहन आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार काय, असा सवाल वैरागड भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :medicineऔषधंhospitalहॉस्पिटल