शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे पुनर्सर्वेक्षण करा

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

सिरोंचा : मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील धानपिकाचे पुनर्सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी रेगुंठा परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसर पूर्णत: मागासलेला असून या परिसरातील बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील नदी- नाल्यांना पूर आला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतींची पाहणी अथवा सर्वेक्षण न करताच तलाठ्यांनी या भागात कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल तहसीलदारांना सादर केला, असा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. रेगुंठा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. मात्र धानपिकांचे योग्य प्रकारे सर्व्हेेक्षण झाले नाही. या परिसरातील शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाल्याने नागरिकही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या परिसरात अतिवृष्टीमुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबरच परिसरातील अनेक शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. अनेक शेतांमध्ये रेतीही आली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिसरात बहुसंख्य शेतकरी धानपिकाची लागवड करता. त्यामुळे रेगुंठा परिसरातील शेतीचे पुनर्सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना सुरेश बालय्या डुरके, सत्यनारायण पोचम परपटलाव, रामय्या मलय्या पिडगु, समय्या मलय्या पोलमपल्ली, तिरूपती भिमय्या पोलमपल्ली, स्वामी सांबय्या पोलमपल्ली, चंद्रया पोचम पोलमपल्ली, व्यंकन्ना पोचम बिरदू, चंद्रू मोंडी रामटेके, नागय्या रामय्या तोगेटी, राजम रामय्या चेलूरी, रामय्या व्यंकया आकूला, चंदू बापू जनगाम, पोशन्ना मदनया आकूला, किष्टय्या नानय्या डुरके, बापू लचय्या पोलमपल्ली, राजू व्येंकटी डुरके, मल्लीकार्जुन आकुला, अ‍ॅड. तिरूपती कोंडागोर्ला, मोंडी मलय्या सुकरी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)