शिवाजी विद्यालयात कर्मचाऱ्यांचे स्नेहमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:49+5:302021-09-26T04:39:49+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री हाेते. उद्घाटन शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी केले. प्रमुख अतिथी ...

Reunion of staff at Shivaji Vidyalaya | शिवाजी विद्यालयात कर्मचाऱ्यांचे स्नेहमिलन

शिवाजी विद्यालयात कर्मचाऱ्यांचे स्नेहमिलन

googlenewsNext

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री हाेते. उद्घाटन शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव जी. व्ही. बानबले, सदस्य डी. एन. चापले, अरुण मुनघाटे, शरद ब्राह्मणवाडे, प्राचार्य सी. बी. किरमे, पर्यवेक्षिका जे. आर. सेलूकर उपस्थित होते. राजकुमार निकम यांनी शिवाजी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दर्जेदार केंद्र आहे, असे सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य जयंत भीलकर, रामराज करकाडे, भास्कर नरुले, विद्यालयातील प्रथम शिक्षक पांडुरंग भांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात ४२ सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पंकज नरुले, तर आभार राकेश खेवले यांनी मानले.

250921\img-20210925-wa0041.jpg

शिवाजी विध्यालयात स्नेहमीलन संपन्न

Web Title: Reunion of staff at Shivaji Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.