वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संकल्प

By Admin | Updated: August 24, 2014 00:00 IST2014-08-24T00:00:29+5:302014-08-24T00:00:29+5:30

जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संकल्प यानिमित्य विद्यार्थ्यांनी केला. आश्रमशाळा रेखेगाव - सुरजमल विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा

Resolve to keep the environment balanced by plantation | वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संकल्प

वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संकल्प

गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संकल्प यानिमित्य विद्यार्थ्यांनी केला.
आश्रमशाळा रेखेगाव - सुरजमल विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा रेखेगाव येथे आॅल इंडिया बंजार सेवा संघ गडचिरोलीच्यावतीने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवर्धन चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल रूडे, वसंत राठोड, रायसिंग राठोड, प्राचार्य विजय चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रकाश जाधव तर आभार अशोक पवार यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी झाडांचे महत्व पटवून दिले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असल्याने प्रत्येकाने किमान एक झाड लावून ता ेजगविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
जिल्हा परिषद शाळा पेटतळा - घोट केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा येथे शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वासुदेव कुनघाडकर, शिक्षक पुरूषोत्तम किरमे, अनंत सडमेक, शिक्षिका दर्राे, पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निरूताई कोवे, सदस्य विलास गेडाम, पितांबर मेश्राम, दिवाकर तुंकलवार, एकनाथ गेडाम, मिना कुसराम, पूजा शेट्टीवार, निता कोसरे, युवराज गोटवार, लक्ष्मण पेंदाम, विजया लाकडे, सरपंच रमेश कन्नाके, बाळापूरे, कोडापे, वनरक्षक जोशी, आरोग्य सेवक न्यालेवार, आरोग्य सेविका दुधबावरे, सुरपाम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक नागरिकाने ‘एक झाड, एक व्यक्ती’ या उपक्रमात सहभाग घ्यावा, वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
पोरेड्डीवार विद्यालयात चातगाव - ‘एक मुल, एक झाड’ या उपक्रमांतर्गत कै. महेश सावकार पोरेड्डीवार चातगाव येथे हरितसेना व स्काऊट पथक अंतर्गत उपशिक्षणाधिकारी आर. पी. निकम, लागवड अधिकारी केरकट्टा, प्राचार्य टी. के. बोरकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सिंधूताई पोरेड्डीवार तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच गोपाल उईके, प्राचार्य जयंत येलमुले, उपसरपंच राजू ठाकरे, तंमुस अध्यक्ष राजू जिवाणी, हेमंत कोडाप, गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना झाड देऊन ते झाड घरी किंवा शेतावर लावून त्याचे संगोपन करण्याविषयी मार्गदर्शन केले.
विद्याभारती हायस्कूल पुराडा - शाळेचे रौप्य महोत्सव वर्षानिमित्य शुक्रवारी शाळेतून वृक्षसंवर्धन दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातून प्रभातफेरी काढून घोषवाक्यांच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याने ‘एक मुल, एक झाड’ लावण्याचे नारे देण्यात आले, वृक्षदिंडीचा समारोप शाळेत करण्यात आल्यानंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच हरिषचंद्र डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम, ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक खरे, पारधी, रावत, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन आर. ई. सोरकर तर आभार व्ही. डी. वाघे यांनी मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघभूमी - मालेवाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळा वाघभूमी येथे टी. डी. कोरेटी यांच्याहस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन कुमरे, मुख्याध्यापक मेश्राम, सहायक शिक्षक उईके, ग्रामपंचायत खामतलाचे सचिव भगत, वासंती कुमरे, देवनाथ कोरेटी, सखाराम कुमरे, वसंत कुमरे, मारोती कुमरे, सोनूजी कुमरे, पोलीस पाटील जास्वंदा उसेंडी, सोनाराम जाडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Resolve to keep the environment balanced by plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.