शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

सर्चच्या युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठीचा संकल्प

By admin | Updated: March 4, 2016 01:23 IST

सर्च या सामाजिक संस्थेत १ ते ३ मार्च या कालावधीत पार पडलेल्या आदिवासी युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठी गावागावात ...

आरोग्य महिलेस किटचे वाटप : ४७ देहारी, पुजाऱ्यांचा सत्कारधानोरा : सर्च या सामाजिक संस्थेत १ ते ३ मार्च या कालावधीत पार पडलेल्या आदिवासी युवा आरोग्य संसदेत दारू व तंबाखू मुक्तीसाठी गावागावात जाऊन लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संसदेत धानोरा तालुक्यातील ३५ गावातून ३१८ युवा सहभागी झाले होते. या संसदेला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, माजी आ. हिरामन वरखडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संसदेत आम्ही आमच्या गावात युवांचे खेळ सुरू करू, त्यात कबड्डी व व्हॉलिबॉल या खेळांची निवड करू, युवा खेळासाठी गावागावातून युवा कोचची निवड करून त्यास सर्चच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊ, जिल्हा पातळीवर युवा खेळ स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी धानोरा तालुक्याची टीम तयार करू, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लोकांकडून शिकू, आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम गावात आयोजित करू, दारू व व्यसनमुक्तीची सुरुवात स्वत:पासून सुरू करू, युवक, युवती, लहान मुले यांना दात घासण्यासाठी दातन वापरण्याबाबत मार्गदर्शन करू, तंबाखू व तंबाखू मुक्तीसाठी गावातील पुजारी व ज्येष्ठ नागरिक यांना समजावून सांगून निर्णय घेऊ, गावातील दारू दुकानदारास दंड करू, बंदी करण्यास सांगू आदी निर्णय युवांनी घेतले.१ मार्च रोजी अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात उद्धव डांगे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने ७० परवान्याचे वाटप आरोग्य संसदेत करण्यात आले. धानोरा तालुक्यातील ४८ गावातील नवजात बालकांची काळजी या कार्यक्रमांतर्गत बाळ व बाळंतीनची काळजी घेणाऱ्या स्त्रियांना साहित्यकीट देण्यात आली. तसेच ३ मार्च रोजी सकाळी मॉ दंतेश्वरी माऊलीची पालखी सकाळी ९ वाजता काढण्यात आली. व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धेमध्ये विजेत्या कुथेगाव, भेंडीकन्हार, उशिरपार, गट्टेपायली, कोवनटोला या संघांना २ हजार रूपयांचे प्रथम व १ हजार रूपयांचे द्वितीय बक्षीस देण्यात आले. यावेळी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी गावातून आलेल्या ४७ देहारी व पूजारी तसेच इलाखा प्रमुखांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)