आरमोरीचे नगराध्यक्षपद एसटीसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:15 PM2018-12-04T23:15:12+5:302018-12-04T23:15:43+5:30

मागील अनेक महिन्यांपासून आरमोरीकरांना प्रतीक्षा असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे नगर विकास राज्यमंत्र्यांच्या दालनात काढण्यात आली. त्यानुसार नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरीचे पहिले नगराध्यक्ष होण्यासाठी आस लावून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.

Reserved for the post of Deputy Chief Minister of Armori | आरमोरीचे नगराध्यक्षपद एसटीसाठी राखीव

आरमोरीचे नगराध्यक्षपद एसटीसाठी राखीव

Next
ठळक मुद्देमुंबईत सोडत : अनेकांचा झाला हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : मागील अनेक महिन्यांपासून आरमोरीकरांना प्रतीक्षा असलेल्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे नगर विकास राज्यमंत्र्यांच्या दालनात काढण्यात आली. त्यानुसार नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरीचे पहिले नगराध्यक्ष होण्यासाठी आस लावून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.
मुंबई येथील नगर विकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात मंगळवारी दुपारी ३ वाजता आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी नगर विकास मंत्रालयाचे अव्वर सचिव सहस्त्रबुध्दे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने, तहसीलदार तथा आरमोरी नगर परिषदेचे प्रशासक यशवंत धाईत, मुख्याधिकारी सतीश चौधरी उपस्थित होते. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांना धक्का बसला आहे. प्रत्येक पक्षाला नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यासाठी राजकीय घडामोडी वाढणार आहेत.

Web Title: Reserved for the post of Deputy Chief Minister of Armori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.