शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

सरकारने १० डिसेंबर २०१९ ला नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले. या कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, बौध्द, पारसी, जैन, ख्रिश्चन आदी समाजाच्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. मात्र मुस्लीम समाजाला यातून जाणूनबुजून वगळण्यात आले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे होता.

ठळक मुद्देदेसाईगंज व अहेरीत निघाला मोर्चा : एसडीओमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : भारत सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी देसाईगंज येथे मुस्लीम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात देसाईगंज येथील शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.सरकारने १० डिसेंबर २०१९ ला नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले. या कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाकिस्तान, अफगानिस्तान, बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, बौध्द, पारसी, जैन, ख्रिश्चन आदी समाजाच्या नागरिकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. मात्र मुस्लीम समाजाला यातून जाणूनबुजून वगळण्यात आले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे होता. मात्र त्यामध्ये मुस्लीम समाजावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब घटनाबाह्य आहे. त्यामुळे नागरी संशोधन बिल मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. अहेले सुन्नत पल्द जमात देसाईगंज या संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. मोर्चात संघटनेचे अध्यक्ष सय्यद आफिद अली तुराम अली, हाजी गणी, आरीफ पटेल, आरीफ खानानी, खादर कुरेशी, नवेद खान, मौलाना नजरूल बारी, सिकंदर ताजी, जावेद कुरेशी, मकसूद खान, मौलाना कफील नुरी आदी सहभागी झाले होते. मोर्चा उपविभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. कायदा मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.अहेरीत निघाला मोर्चानागरी संशोधन बिल रद्द करावा, यासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने अहेरी येथे मोर्चा काढण्यात आला. मस्जिद चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी राहूल गुप्ता यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन दिले. एनआरसी व नागरी संशोधन बिल रद्द करावे, हे दोन्ही बिल मुस्लीम समाजावर अन्याय करणारे असल्याचे म्हटले आहे. बिल रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम