शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

गोगाव येथील उपसा सिंचन योजनेची दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 02:18 IST

तालुक्यातील गोगाव येथील उपसा सिंचन योजना दुरूस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

आंदोलनाचा परिणाम : सिंचन विभागाचे अधिकारी दाखलगडचरोली : तालुक्यातील गोगाव येथील उपसा सिंचन योजना दुरूस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सदर उपसा सिंचन योजना लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गोगाव येथील उपसा सिंचन योेजनेच्या माध्यमातून ७०० हेक्टरला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही या योजनेच्या भरवशावर पीक झाले होते. उन्हाळ्यामध्ये या योजनेची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजना बंद पडली होती. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक पाण्याअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे उपसा सिंचन योजना सुरू करणे आवश्यक होते. गावातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन योजना सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. गावातील नागरिकांनी गुरूवारी सिंचन योजनेवर जाऊन आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत कारवाफा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी डी. जी. कोहाडे, स्थापत्य अभियंता राकू गेडेकर, गड्डमवार, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष रामदास बोबाटे, शेतकरी कालिदास चापले, नानाजी चौधरी, मधुकर चौधरी, भक्तदास चौैधरी, सीताराम टेंभूर्णे, भास्कर मुनघाटे, बापूजी दिवटे, भास्कर म्हशाखेत्री, गणेश पालेरवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)आंदोलनाचा दिला इशारासिंचन योजना दुरूस्त करणारी टीम आल्याचे माहित होताच गावातील नागरिकांनी सिंचन योजनेकडे धाव घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या कारवाफा प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी डी. जी. कोहाडे यांनी सिंचन योजना सुरू केली जाईल, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचे धानपीक करपू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले. योजना सुरू न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.