येंगलखेडावासीयांच्या लढ्यानंतर तलावाची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:49+5:30

यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.

Repair of the lake after the battle of Yengalkheda people | येंगलखेडावासीयांच्या लढ्यानंतर तलावाची दुरूस्ती

येंगलखेडावासीयांच्या लढ्यानंतर तलावाची दुरूस्ती

ठळक मुद्दे३४४ एकराला सिंचनाची क्षमता : जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : वनकायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या जांभुळखेडा येथील सिंचन तलावासाठी गावकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. तलावासोबत कालव्याचेही काम पूर्ण झाले आहे. गुरूवारी (दि.२३) जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने जांभुळखेडावासीयांनी आनंद व्यक्त केला. या तलावामुळे ३४४ एकर श्ोती सिंचनाखाली येणार आहे. हा तलाव गावाच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, तहसीलदार सोमनाथ माळी, गटविकास अधिकारी अनिता तेलंग, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता भूमेश दमाहे, उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल, सरपंच शिवाजी राऊत व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजगार उपलब्ध करून दिला. तलावाच्या कालव्याची लांबी २ हजार १०० मीटर आहे. या तलावाच्या पाण्यामुळे यावर्षीच्या ३४४ एकरातील खरीप हंगामासाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. एकूणच हा तलाव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. गावकरी, राजकीय नेते आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचे जांभूळखेड्याचा तलाव हे उत्तम उदाहरण आहे.

अन् तलाव पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला
जांभुळखेडा गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर ४० हेक्टर जागेत असलेला सिंचन तलाव वनकायद्याच्या कचाट्यात सापडला होता. दरम्यान १९८५ च्या पावसाळ्यात पाळ फुटल्याने तलावाचे अतोनात नुकसान झाले. तलावाच्या दुरूस्तीसाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

Web Title: Repair of the lake after the battle of Yengalkheda people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण